राज्य प्रशासनातील मराठी वापरावर Kailas Patil यांचा सवाल; पाटलांच्या सवालानंतर सामंतांची मोठी घोषणा

राज्याच्या प्रशासनामध्ये मराठी भाषेचा वापर नेमका किती होतो, यावरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.कैलास पाटील यांनी शासकीय कामकाज, कोर्टाची प्रक्रिया आणि बँक व्यवहार खरोखर मराठीत होतात का, असा थेट सवाल उपस्थित केला आहे.सरकारी कार्यालयांमध्ये कामकाज मराठीत होतं का? कोर्टाचे निकाल मराठीत मिळतात का? आणि बँकांमध्ये अजूनही फॉर्म इंग्रजीतच का दिले जातात? तसंच, जिल्हाधिकाऱ्यांना मराठी येतं का, हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी प्रत्येक जिल्ह्यात ‘मराठी भाषा अधिकारी’ नियुक्त करण्याची घोषणा केली आहे.

संबंधित व्हिडीओ