मुंबईकरांनो, आताच पाणी वाचवलं नाहीत तर पुढच्या काळात तुम्हाला चक्क सांडपाणी प्यावं लागणार आहे... कारण अल निनोचं संकट, कमी होत जाणारा पाऊस या सगळ्याची शक्यता लक्षात घेता आता मुंबईत सांडपाण्यावर प्रक्रिया करुन तेच पाणी पिण्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे... त्यासाठी या प्रकल्पामध्ये कामसुद्धा सुरू झालंय... सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन कसं तयार होणार पिण्याचं पाणी, हे आज आम्ही तुम्हाला फक्त NDTV मराठीवर EXCLUSIVE दाखवणार आहोत.