Kalyan| उल्हास,काळू नदीने धोक्याची पातळी ओलांडली,रस्त्यावर वाहतूक कोंडी; याचाच NDTV ने घेतलेला आढावा

कल्याणसह ग्रामीण परिसरात जोरदार पावसामुळे उल्हास आणि काळू नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कल्याण खाडीच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. कल्याण खाडी परिसरातील नागरीकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. कल्याण खाडी परिसर भागात म्हशीचे तबेले मोठ्या प्रमाणात आहे. या तलेबल्यातील म्हशींना बाहेर काढून त्यांना गोविंदवाडी बायपास रस्त्यावर बांधण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी...

संबंधित व्हिडीओ