नसरापूरप्रमाणेच 3 वर्षांपूर्वी Jalgaon मध्येही अत्याचाराची घटना; Rohit Pawar कुटुंबीयांच्या भेटीला

पुण्याच्या भोरमधील नसरापूर येथील घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय.या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी सदर खटला हा फास्ट ट्रॅक अर्थात जलद गती न्यायालयात चालला जाईल असे आश्वासन दिले. मात्र खरंच जलद गती न्यायालय खटला चालवून दोषी व आरोपींवर तात्काळ कारवाई करते का? असा प्रश्न निर्माण झालाय.कारण नसरापूरच्या घटनेप्रमाणेच 2023 मध्ये जळगावमध्येही घटना घडली असून या घटनेनंतर सदर खटला हा फास्टट्रॅक अर्थात जलद गती न्यायालयात आहे मात्र तीन वर्ष उलटून गेली तरी सात वर्षाच्या चिमुकलेच्या पीडित कुटुंबीयांना न्यायाची प्रतीक्षा आहे.आमदार रोहित पवार यांनीही या पीडित कुटुंबीयांची भेट घेतलीय. रोहित पवारांनी पोलीस अधीक्षक व इतर न्यायव्यवस्थेकडून या प्रकरणाचा आढावा घेत तीन वर्षापासून जलद गती न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणांमध्ये अद्यापही न्याय मिळत नसल्याने खंत व्यक्त केली आहे.

संबंधित व्हिडीओ