एकीकडे अवकाळीमुळे मोठं नुकसान होतंय. शेतात पाणी भरल्यानं अनेकांची पिकं उद्ध्वस्त झालीत.दुसरीकडे मात्र हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावं लागतं आहे.मराठवाड्यातील 377 गावांमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय.मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीटंचाई गंभीर झाल्याचे पाहायला मिळत आहे.हिंगोली जिल्ह्यात 27 सिंचन तलावाच्या पाणीसाठ्यात मोठी घट झालीय. अकोल्यात तर नागरिकांना चक्क छोट्या भांड्यातून पाणी भरावं लागतंय,. यंदा मार्च महिन्यात विहिरींनी तळ गाठले. यामुळे जलसाठाच शिल्लक नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. Maharashtra Water Crisis