लाडकी बहीण योजनेसाठी इतर खात्यांचा निधी वळवल्यानं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केलाय. निधी वळवल्याची कल्पना नसून याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असं शिरसाट म्हणालेत.तर अर्थखात्यात काही शकुनी महाभाग बसलेत.निधी कसाही वळवता येतो असं या महाभागांना वाटतं.असा अप्रत्यक्ष निशाणा शिरसाट यांनी अजित पवारांना लगावलाय.. तर निधीबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय झाल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलीय.