Pune Heat wave| पुण्यात उन्हाची तीव्रता वाढली, वणव्यांमुळे जंगलातील चाराखाद्य नष्ट; वन्यजीव हैराण

पुणे शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली.भीषण वणव्यांमुळे जंगलातील चाराखाद्य नष्ट झाल्याने वन्यजीव हैराण झालेत.सिंहगडच्या जंगलात विविध ठिकाणी असणाऱ्या दहा पाण्याच्या तळ्यांत वन्यजीवांसाठी पाण्याची सोय करण्यात येत आहे.सिंहगड किल्ल्याच्या पश्चिमेच्या घेरा सिंहगड, थोपटेवाडी येथील शिवकालीन काळूबाई जंगलातील दोन तळ्यांत टँकरने पाणी सोडण्यात आलंय.त्यामुळं वन्यजीवांसाठी वन विभागाकडून बांधण्यात आलेल्या तळ्यात सध्या टँकरने पाणी सोडले जात आहे. आठ-दहा दिवसांपासून पाणी सोडले जात असल्यामुळे वन्यप्राण्यांसह पक्ष्यांची तहान भागवली जात आहे.

संबंधित व्हिडीओ