Jalna| कृषी विभागाची मोठी कारवाई; 462 युरिया खताच्या बॅगचा अनधिकृत साठा जप्त, याचाच घेतलेला आढावा

जालना जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने मोठी कारवाई करत अनधिकृत खत वाहतुकीचा पर्दाफाश केला आहे. घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील कृषी सेवा केंद्रातून आरसीएफ कंपनीच्या युरिया खताच्या तब्बल 462 बॅग अनधिकृतपणे वाहतूक करत असताना एक ट्रक पकडण्यात आला. विशेष म्हणजे, जवळपास 70 किलोमीटर पाठलाग करून हा ट्रक अडवण्यात आला. सध्या ट्रक जप्त करण्यात आला असला तरी चालक फरार झाला आहे. एका औद्योगिक कंपनीला बेकायदेशीररित्या खत पुरवठा होत असल्याच्या संशयावरून कृषी विभागाने सापळा रचला होता. या प्रकरणी कृषी सेवा केंद्राचा मालक, ट्रक मालक आणि खत खरेदी करणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी.

संबंधित व्हिडीओ