माळशेज घाटाजवळ करंजाळे गावाच्या हद्दीत रस्ता खचल्यामुळे कल्याण–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग गेल्या सात दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा फटका बसत असून, पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, अवघ्या वर्षभरापूर्वी तयार झालेल्या या रस्त्याच्या गुणवत्तेबाबतही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.