नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलचे फोन कॉल्स आणि मोबाईल डेटा रिकव्हर करण्याचे काम एसआयटीकडून सुरू आहे.मतीन पटेलच्या फोनवरून इम्तियाज जलील यांच्यासह इतर राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत फोनवरून संभाषण झाल्याची माहिती मिळतीय.निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेलवर आरोप आहे, निदाला कोणाच्या सांगण्यावरून मतीनने आश्रय दिला याचा एसआयटी कडून तपास सुरूय. मतीन पटेल पुन्हा उद्या नाशिक पोलिसांसमोर हजर होणार आहे, याआधी दोन वेळा मतीन पटेल चे नाशिक पोलिसांकडून करण्यात आली चौकशी.