म्हाडाने पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करून मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. मुंबईतील शहाण्णव इमारती धोकादायक असल्याचं या यादीनुसार सांगण्यात आलंय. यामध्ये गिरगाव परिसरातील जवळपास बारा इमारतींचा समावेश आहे. जर या इमारती रिकाम्या करायच्या झाल्या तर गिरगावकरांनी जायचं कुठे? असा प्रश्न आता गिरगावकरांसमोर उभा राहिला आहे.