मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी मतदार याद्या स्वच्छ करण्याची जोरदार मागणी केली होती, पण निवडणूक आयोगाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. बिहार, केरळ, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका झाल्यावरच महाराष्ट्रातील याद्यांची छाननी केली जाईल, असा आयोगाचा निर्णय आहे. या निर्णयामुळे मनसे विरुद्ध निवडणूक आयोगाचा संघर्ष अटळ झाला आहे. राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील 'घोळ' असल्याचा थेट आरोप करत आयोगाला आव्हान दिले आहे. हा संपूर्ण वाद आणि त्याचे राजकीय परिणाम काय असतील, पाहुयात या रिपोर्टमध्ये.