Mumbai च्या आरे कॉलनीमध्ये अनधिकृत दर्ग्यावर मुंबई पालिकेचा बुलडोझर; आतापर्यतं काय-काय घडलं?

आरे पोलीस ठाण्यापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर हा दर्गा उभारण्यात आला होता... आज या अनाधिकृत दर्ग्यावरती आरे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवला... यापूर्वी २०१७ आणि २०१८ मध्ये तो पाडण्यात आला होता... मात्र पुनर्बांधणीनंतर त्याचा विस्तार पुन्हा होत गेला... भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावर्षी एप्रिल महिन्यात या दर्ग्याला भेट देऊन तो हटविण्याची मागणी केली होती.., जेणेकरून सरकारी जमिनीचा मूळ उद्देशासाठी वापर करता येईल... आरे प्रशासनाने दर्गा व्यवस्थापनाला नोटीस बजावली होती.. आणि त्याच्या कायदेशीरतेबाबत पुरावे सादर करण्यासाठी विश्वस्तांना वेळ दिला होता... मात्र, स्थानिक रहिवासी आणि विश्वस्त हे दर्ग्याची कायदेशीरता सिद्ध करू शकले नाहीत..., तसेच त्यांनी स्वतःहून बांधकाम हटवलेही नाही... त्यामुळे आज हा दर्गा पाडण्यात आला.

संबंधित व्हिडीओ