चेंबूरमधय्ये झाड कोसळून एकाचा जीव गेल्यानंतर अखेर मुंबई महापालिकेला उशिरा का होईना शहाणपण आलंय. त्याच ठिकाणी आता रस्त्यावरील धोकादायक झाडांची छाटणी सुरू करण्यात आली आहे. याआधी याच रस्त्यावर एक झाड कोलमडून पडल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. आता तरी पुन्हा अशी दुर्घटना टाळण्यासाठी पालिका वेळीच सावध होईल का, हा प्रश्न मात्र कायम आहे.