नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून मुंबईच्या चैत्यभूमी परिसरात युवक काँग्रेसने आंदोलन केलंय. माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केलीय. मोर्चादरम्यान आक्रमक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रास्ता रोकोचा प्रयत्न केला असता मुंबई पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.