मुंबई-गोवा महामार्गाचे काम 31 मे अखेर पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणवासीयांना दिली होती. पण ३१ मे उलटून जून सुरू झाला तरी महामार्गाचे उर्वरित काम मार्गी लागलेले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोकणवासीयांचा प्रवास काही प्रमाणात गैरसोयीचाच ठरणार आहे.खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मंत्री गडकरी यांनी दीर्घकाळ रखडलेल्या या महामार्गाचे काम ३१ मेअखेर पूर्ण होईल, असे सांगितले होते. तरी अद्याप हे उर्वरित काम अपूर्ण आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी.