Mumbai Malad Crime| मालवणीत धारदार शस्त्रांनी तिघांवर जीवघेणा हल्ला, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरात आज धक्कादायक घटना घडली आहे. मालवणीतल्या सहा नंबर रोडवरील हाथी गार्डनजवळ तिघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झालेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात केली. हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, पोलीस उपायुक्त संदीप घुगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करत आहेत.

संबंधित व्हिडीओ