परभणीच्या पालकमंत्री आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या निवासस्थानीही आज पारंपरिक पद्धतीने गौरींचे स्वागत करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रद्धा आणि भक्तिभावाने गौरींची स्थापना करण्यात आली. आकर्षक फुलांची सजावट आणि पारंपरिक आरास यामुळे उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मेघना बोर्डीकर यांनी कुटुंबीयांसह विधिवत पूजन करून गौरींचे आशीर्वाद घेतले.