मुंबईतील आयआयटी पवई परिसरात एका विद्यार्थ्यानं आयुष्य संपवल्यानंतर वातावरण तापलं आहे. वसतिगृहात ही घटना घडली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये आंदोलन करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केल्याची माहिती आहे. घटनेमागील नेमके कारण आणि संबंधित आरोपांची चौकशी सुरू असून आयआयटी प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.