पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण आणि मंगलमय वातावरणात निरोप देण्यात आला. सोमवारी श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी भक्तिभावाने घराघरांत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. पाच दिवसांच्या कालावधीत भाविकांनी गणरायाची मनोभावे पूजा, आरती आणि भजन करून भक्तीमय वातावरण निर्माण केले. शुक्रवारी उत्तरपूजा केल्यानंतर दुपारपासून विविध ठिकाणी गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली. पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत भाविकांनी नदी, नाले तसेच अन्य नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन केले. पाच दिवसांचा पाहुणचार आटोपून लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविक भावुक झाले.