पश्चिम आशियामध्ये तणावात भर पडली आहे ती सौदी अरेबिया आणि येमेनमधील हुती बंडखोरांमधील युद्धामुळे. या संघर्षात तेलवाहतुकीचा महत्त्वाच्या मार्गांपैकी एक बाब अल मनदेब ही धोक्यात आलेला आहे.
सौदीवर हुतींकडून ड्रोन हल्ले केले जात आहेत, अशात सौदीसह नुकतेच करार करून मित्र झालेले पाकिस्तान आणि तुर्कीये मात्र या हल्ल्यांबाबत केवळ शाब्दिक धीर देताना दिसत आहेत. दोन्ही देशांनी हुतींच्या हल्ल्यांचा निषेध तर व्यक्त केलेला आहे. पण सौदीच्या मदतीसाठी शस्त्र आणि सैन्य युद्धात उतरवलेलं नाही. खरंतर पाकिस्तानसह मक्का कराराआधीच सौदीचा वेगळा संरक्षण करार ही झालेला आहे. त्यानुसार पाकिस्तानी सैन्य सौदीत उपस्थित ही होतं. पण या सैन्याला अद्याप युद्धात किंवा हुतींविरोधात कारवाईचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत, दोन्ही देशांनी मक्काजवळील अशात सौदीकडून फ्रान्स, ब्रिटन, इजिप्त, इस्रायल आणि पाकिस्तानकडे ही मदतीची मागणी करण्यात आलेली आहे.