मुंबईतील साकीनाका इथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. अस्लम शेख असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. रस्त्यावरून चालत असताना 25 ते 30 फूट खोल मॅनहोलमध्ये ही व्यक्ती पडली. यानंतर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. मात्र अस्लम शेख यांना बाहेर काढण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेनंतर मुंबईकरांच्या जीवाशी खेळ होत असल्याची भावना व्यक्त केली जातेय. 2 दिवसांपूर्वीच चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज 55 वर्षीय वृद्धाचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालाय. त्यामुळे पालिका प्रशासन पाण्यासारखा पैसा खर्च करूनही नागरिकांचे जीव धोक्यात आहेत.