#MumbaiMetro #MumbaiMetro3 मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी.कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो तीन मार्गिकेतील बीकेसीचा टप्पा लवकरच सुरु होणार आहे.त्यामुळे आता काही दिवसातच मुंबईकरांना आरे-आचार्य अत्रे चौक, वरळी असा थेट भुयारी मेट्रो प्रवास करता येणार आहे.सीएमआरएसकडून सुरक्षा प्रमाणपत्र जारी केले जाईल.हे प्रमाणपत्र मिळताच हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास आरे, मरोळ नाका, सांताक्रुझ, बीकेसी येथून थेट वरळीला,आचार्य अत्रे चौकापर्यंत पोहचणे सोपे होणार आहे.