विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबांवर संकट कोसळलं आहे. घरांमध्ये पुराचे पाणी शिरणे, गाळ साचणे, धान्य आणि घरगुती वस्तूंचे नुकसान होणे अशा समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत महाराष्ट्राचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी माणुसकीचा आदर्श ठेवत पूरग्रस्तांसाठी आपल्या घराची दारे उघडी केली आहेत.सोशल मीडियावर आणि आपल्या स्टेटसच्या माध्यमातून त्यांनी मदतीचे आवाहन करत, अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांना निवारा आणि सहकार्य देण्याची तयारी दर्शवली आहे. संकटाच्या काळात सर्वांनी एकमेकांच्या मदतीला धावून यावे, असा संदेशही त्यांनी दिला आहे.याच पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी विष्णू मनोहर यांच्याशी खास बातचीत केली.