नांदेड ग्रामीण रुग्णालयात उंदरांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयाच्या विविध वॉर्ड्समध्ये, प्रतीक्षालयात आणि अगदी उपचार कक्षांमध्येही उंदरांचा वावर वाढल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.