Nashik| येवल्यातील कोळमच्या आवारे वस्तीवर सशस्त्र दरोडा;घरातील महिला,पुरुषांना दरोडेखोरांकडून मारहाण

नाशिकच्या येवला तालुक्यातील कोळम येथील आवरे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास 4 ते 5 अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून घरातील महिलांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोने , चांदीचे दागिने व कपाटातील 50 हजार रुपये रोकड चोरून नेली.उकाड्यामुळे आवारे कुटुंबाततील पुरुष घराबाहेरील ओट्यावर झोपलेले असताना चाकूचा धाक दाखवून दरवाजा खोलण्यास भाग पाडण्यात आले. यानंतर दरोडेखोरांनी घरात झोपलेल्या चार वर्षाच्या चिमुरडीच्या गळ्यावर चाकू लावून महिलांना मारहाण करत ही जबरी लूट केली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी तात्काळ या दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

संबंधित व्हिडीओ