मुसळधार पावसामुळे अणू शक्ती नगर परिसरातील मेट्रो ब्रिजच्या खालील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पावसाच्या पाण्याच्या तडाख्यामुळे रस्त्यावरचे डांबर वाहून गेले असून ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत.या ठिकाणी दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या धोक्याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले असले तरी संबंधित विभागाने अद्याप कोणतीही जबाबदारी स्वीकारलेली नाही.