तर नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेले आहेत. लातूरमध्ये चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काल या प्रकरणी लातूर मधून दोन संशयित शिक्षकांना ATS ने ताब्यात घेतलं होतं. चौकशी नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. संजय जाधव आणि जलील पट. पठाण अशी या दोन्ही संशयितांची नावं आहेत. यापैकी संजय जाधव आता फरार झालेला आहे.