अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडलेत.भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा निर्माण झाली आहे.अरबी समुद्रात आठ वर्षांच्या कालावधीनंतर १८ हजार चौरस किमी क्षेत्रफळाहून अधिक खनिज तेलाचे नवे साठे समोर आले आहेत.हे साठे सिंधुदुर्गातील मालवणजवळ, पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील समुद्रात आहेत.त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरूप्रसाद दळवी यांनी.