Satish Deshmukh| बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई, एक वर्षासाठी हद्दपार करण्यात येणार

बीडच्या शिरुर कासारमधील अमानुष मारहाण प्रकरणी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर अटक करण्यात आली. 6 दिवसानतंर फरार असलेल्या सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक झाली.दरम्यान, त्याला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात येणार असून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी त्याच्या हद्दपारीला मान्यता दिलीय.लवकरच सतीश भोसलेला बीडमध्ये आणण्यात येणार आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश भोसले हा प्रयागराजमधून पळण्याच्या तयारीत होता.सतीश भोसले उर्फ खोक्या याला अटक केल्यानंतरचा त्याचा फोटो NDTV मराठीच्या हाती आलाय.दरम्यान भोसलेच्या वकिलाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतलाय.

संबंधित व्हिडीओ