NDTV Marathi Special| सात दिवसांनी का होईना संपलेल्या कुंभमेळ्यातून सुरेश धसांचा लाडका खोक्या अटकेत

धनंजय मुंडेचा वाल्मिक कराड जेलमध्ये पोहोचवता पोहोचवता बीड पोलीसांच्या नाकी नऊ आले.शेवटी वाल्मिक कराडच म्हणाला थांबा मी येतो आणि मस्त अलिशान गाडीतून पोलीसांकडे आला.मग समोर आला सुरेश धसांचा वाल्मिक कराड. त्याचं नाव सतीश भोसले उर्फ खोक्या..या खोक्याची मोडस ऑपरेंडी पण तीच, हाणामाऱ्या, धमक्या, सावकारी, वसूली वगैरे वगैरे याचे कारनामे समोर आल्यावर हा पण गायब झाला. यालाही शोधताना बीड पोलीसांच्या नाकी नऊ आले.वर पोलीसांच्या जखमेवर मीठ म्हणून की काय.. हा फरार राहून टीव्हीवर मुलाखती द्यायला लागला.. आपल्याविरोधात तक्रार केलेल्यांवर गंभीर गुन्हे दाखल करू लागला.. मग तो शरण येण्याचे संदेश धाडू लागला... आता इतकं सगळं करून हा खोक्या सरेंडर झाला असता.. तर बीड पोलीसांची उरलीसुरली लाजही गेली असती.. त्यामुळे सात दिवसांनी का होईना संपलेल्या कुंभमेळ्यातून हा रिकामा खोका बीड पोलीसांनी महाराष्ट्रात आणलाच.

संबंधित व्हिडीओ