NDTV Marathi Special Report| खरंच नाशिकमध्ये दिसलेला तो कृष्णा आंधळेच होता का?

कृष्णा आंधळे गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्राचं सगळं पोलीस खातं या व्यक्तीच्या मागे लागलंय.महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोलीस त्याला शोधतायत. पण हा कृष्णा आंधळे काही पोलीसांच्या हाती लागत नाहीय. बीडच्या संतोष देशमुखांना जीवघेणी मारहाण करताना याच कृष्णा आंधळेच्या अंगात जणू सैतान संचारला होता.पण संतोष देशमुखांची हत्या झाली आणि कृष्णा आंधळे जो पसार झाला तो आजतागायत सापडलेला नाही.आता मात्र कृष्णा आंधळे पोलीसांच्या हाती लागेल अशी नवी आशा निर्माण झालीय.कारण नाशिकमधल्या एका मंदिराच्या जवळ कृष्णा आंधळेला पाहिल्याचा दावा नाशिकमधल्या वकिलांनी केलाय.पण वकीलांनी पाहिलेली व्यक्ती खरंच कृष्णा आंधळे होती का.पाहूयात हा रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ