महाराष्ट्राच्या गुन्हेगारीचा पॅटर्न असं म्हटलं की तुमच्या नजरेसमोर कुठलं नाव येतं? मुळशी पॅटर्न ना.पण आता मुळशी पॅटर्न विसरा.. मुळशी पॅटर्नला तोंड देणारा नवा गुन्हेगारी पॅटर्न महाराष्ट्रात सुरू झालाय.. त्याची सुरूवात बीडमधून झाली असेल.. पण ही कीड आता महाराष्ट्रात सगळीकडे पसरतेय की काय अशी शंका येऊ लागलेय.. एखाद्या व्यक्तीला जीवघेणी मारहाण करायची आणि ती मारहाण त्या व्यक्तीचं किंचाळणं, विव्हळणं, विनवण्या करणं या सगळ्याचा व्हिडिओ करून तो सोशल मिडियावर टाकायचा असा हा पॅटर्न आहे... यातल्या बऱ्याचजणांना राजकीय अभय मिळाल्यामुळे दिवसाढवळ्या ही दहशत माजवताना या कार्यकर्तेरूपी गुंडांना जराही भीती वाटत नाही.. पण या पॅटर्नमुळे महाराष्ट्र पोलिसांचे मात्र चांगलेच वाभाडे निघतायत, पाहुयात एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट गँग्ज ऑफ महाराष्ट्र