एकीकडे प्रकाश महाजन यांनी राणे कुटुंबा विरोधात दंड थोपटलेले आहेत. दुसरीकडे मी प्रमोद महाजन यांना ओळखतो. चिरीमिरी लोकांना ओळखत नाही असा टोला नितेश राणेंनी प्रकाश महाजन यांना लगावला आहे. यावरच आता प्रकाश महाजन यांनी सुद्धा उत्तर दिलंय. कुणाला कुठे चिरी आणि कुठे मिरी लागायची ती लागलीये. तुमची ओळखच सर्टिफिकेट मला लागत नसल्याचं महाजन यांनी म्हटलंय.