हिमाचल प्रदेशमध्ये वादळाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.तर दिल्लीतही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. दिल्लीतही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शिमलासह अनेक भागात बर्फवृष्टी झाली.हिमाचल प्रदेशमधील अनेक भागात आज बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.राज्यातील काही भागात कालपासून रिमझिम पाऊस सुरू आहे.त्यामुळे हिमाचल प्रदेशमधील जनजीवन विस्कळीत झालंय.