Pahalgam Terror Attack| कर्ता मुलगा गेला... कुटुंबियांचा आक्रोश; दोन स्थानिकांनाही केलं लक्ष्य

पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेत 8 ते 10 दहशतवादी सहभागी असू शकतात. स्थानिक मदतनीस असलेले 2 ते 3 दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात असल्याचा संशय आहे. त्याच वेळी, 5 ते 7 दहशतवादी पाकिस्तानी वंशाचे असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या हल्ल्यात पहलगाममधील दोन स्थानिक मुस्लीमांना सुद्धा गोळ्या घालण्यात आल्या आहेत. यानंतर मृताच्या आईने घरातील एकमेव हात गेल्याने आक्रोश केला. तो घोडा चालवत होता आणि घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती, असे धाय मोकलून रडत सांगितले.

संबंधित व्हिडीओ