मावळमधील देहूरोड येथील पर्यटकांच्या मोबाईलमध्ये पहलगाममधील संशयित दहशतवादी कैद झाल्याची माहिती समोर येते. श्रीजीत रमेशन हे हल्ल्यावेळी काश्मीरमध्ये परिवारासोबत पर्यटनासाठी गेले होते. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये संशयित दहशतवाद्यांचे फोटो कैद झाले आहेत. या फोटोंबाबत त्यांनी एनआयएला माहिती दिलीय.. पहलगामला ते गेले होते, तिकडे फिरत असताना ते आपल्या मुलीचा व्हिडीओ काढत असताना हे संशयित दहशतवादी त्यामध्ये कैद झाले आहेत. हा व्हिडीओ एनआयएकडे सोपवण्यात आला असून, तपासाला सुरुवात झाली आहे.