पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून आज सकाळी आठ वाजता दहा दरवाजे 0.5 मिटरने उघडून पूर्णा नदी पात्रात 21100.40 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून तसेच खडकपूर्णा धरणातून विसर्ग चालू असल्याने येलदरी धरणाचे प्रथम सहा, नंतर एकूण दहा गेट 0.5 मी. ने उघडण्यात आले आहेत. 21100.40 क्यूसेस इतका विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला असून येलदरी जलविद्युत केंद्राच्या गेटद्वारेही 2700 क्यूसेस पाणी पूर्णा नदी पात्रात सोडले जात आहे, प्रशासनातर्फे खबरदारी घेण्याचे आव्हान केले असून अद्याप कुठे हि पूर्वजन्य परिस्तिथी निर्माण झालेली दिसून येत नाहीय