आठ दिवसांपूर्वी 'स्वबळाची' भाषा करणारे धर्मराव बाबा आत्राम यांचे सूर आता बदलले आहेत. काही दिवसांपूर्वी चामोर्शी येथील सभेत भाजपला 'एक तुकडा'ही देणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. पण आज देसाईगंज येथील सभेत त्यांनी भूमिका बदलत, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीसोबत मिळूनच लढण्याची तयारी दर्शवली आहे. शिवसेनेसोबत चर्चा झाली, पण भाजपसोबत अजून व्हायची आहे, असे सांगत त्यांनी 'मैत्रीपूर्ण लढती'ऐवजी महायुतीच्या एकजुटीवर भर दिला आहे. आत्राम यांच्या या यू-टर्नमुळे गडचिरोलीच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.