उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात 'बाळासाहेब आपला दवाखाना' या महत्त्वाकांक्षी आरोग्य योजनेचा फज्जा उडाला आहे. गोरगरिबांना मोफत उपचार देण्यासाठी सुरू झालेल्या दवाखान्यांमध्ये आता औषधांऐवजी चक्क साड्यांचे दुकान थाटले गेले आहे. अनेक 'आपला दवाखाना' केंद्र बंद पडली असून कर्मचाऱ्यांचे पगारही थकले आहेत. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी यावरून महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. पाहा ठाण्यात या योजनेचे काय झाले!