मुस्लिमांची देशात वाढलेली लोकसंख्य बघता देशाला धोका निर्माण झाला आहे. ही लोकसंख्या नियंत्रणात आणायची असेल तर लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्यात यावा.. अशी मागणी आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी केली आहे. वर्ध्यात प्रवीण तोगडीया एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता तोगडीया माध्यमांशी बोलत होते.