Fort Raigad वर Pre-Wedding शूट, प्री-वेडिंगचा Video Viral झाल्यानंतर वाद; शिवप्रेमींचा संताप

किल्ले रायगडावर प्रि-वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींशी जोडलेल्या शिवसमाधी परिसरात असे शूट झाल्याचे समोर येताच शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.सोशल मीडियावर या घटनेविरोधात जोरदार प्रतिक्रिया उमटत असून, “श्रद्धास्थळांचा अशा प्रकारे वापर योग्य आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, किल्ले रायगडावर प्री-वेडिंग शूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दुर्ग रक्षक आणि शिवप्रेमींकडून जोर धरत आहे. अन्यथा, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग रक्षक स्वतः आंदोलन छेडतील, असा इशारा दुर्ग रक्षक अभ्यासक सुखद राणे यांनी दिलाय. तर याप्रकरणी खासदार सुनील तटकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली असून, प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित व्हिडीओ