Dhirendra Shastri यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन, शिवरायांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात जोरदार निषेध

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीची विधानं करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींना महाराष्ट्रात बंदी घाला, असं म्हणत अमरावती शहर काँग्रेसने आंदोलन केलं. यावेळी धीरेंद्र शास्त्रींच्या प्रतिक्रात्मक फोटोला जोडे मारून काँग्रेसनं धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याचा निषेध केलाय. तसंच अशा बुवा-बाबांना सरकारकडून प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोपही यावेळी काँग्रेसने केलाय.धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या शिवरायांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात जोरदार निषेध व्यक्त करण्यात येतोय.संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ ,जिजाऊ ब्रिगेडकडून नागपुरातील छत्रपती चौकात आंदोलन करण्यात आलंय.तर संगमनेरमध्येही जोरदार आंदोलन करण्यात आलंय. धीरेंद्र शास्त्री, संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत जाहीर निषेध करण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ