Pune| खराडी-केशवनगर पूल अद्याप बंद, काम पूर्ण होऊन 7 महिने उलटले; याचसंदर्भातला Ground Report

पुण्यातील खराडी, मुंढवा आणि केशवनगर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी उभारण्यात आलेला. मुळा-मुठा नदीवरील खराडी-केशवनगर पूल गेल्या सात महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. तब्बल 23 कोटी 20 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असले,तरी केशवनगरकडील सुमारे 700 मीटर जोडरस्त्याचे काम अपूर्ण असल्याने पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही.मात्र, स्थानिक नागरिक वेगळाच आरोप करत आहेत. राजकीय श्रेयवादाच्या लढाईमुळे हा पूल रखडल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. खराडी आणि मुंढवा परिसरात आयटी कंपन्या, व्यावसायिक संकुले, शैक्षणिक संस्था आणि मोठ्या गृहसंकुलांमुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते.

संबंधित व्हिडीओ