Pune|फुगेवाडी दारूकांड प्रकरणात मोठी अपडेट, 4 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी दत्ता लोंढे अखेर अटकेत

फुगेवाडी दारूकांड प्रकरणातील फरार आरोपी पुणे ग्रामीण पोलिसांन सापळा रचून पकडला.दत्ता लोंढे असं फरार आरोपीचे नाव असून गाडीची नंबर प्लेट बदलून, वेष बदलून हा आरोपी वावरत होता.पुणे ग्रामीण पोलिसांनी या आरोपीला राजेवाडीतून ताब्यात घेतलाय.हा आरोपी गेल्या 4 महिन्यांपासून फरारी होता.लोंढे यांने संपूर्ण अवैध दारू निर्मिती आणि वितरणाचा सिंडिकेट चालवला होता.योगेश वानखेडे आणि इतर आरोपी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी काही वेळापूर्वी ताब्यात घेतल असून, पंचनामा व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या आरोपीला सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती.

संबंधित व्हिडीओ