राज्यात अनेक ठिकाणी 3 तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय.पुढील 3 तासात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय.नागपूर, पूर्व विदर्भासह 5 जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या पाच जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तासात पाऊस होणारेय. तर काही ठराविक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.विदर्भाशिवाय महाराष्ट्रात अन्य काही ठिकाणी विजा, गारांसह पाऊस येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे..