मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना काही धक्कादायक दुर्घटनांनी भाविकांमध्ये चिंता वाढवली आहे.काळाचौकीतील महागणपती मंडळाजवळ विजेचा शॉक लागून दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले... जोगेश्वरीत कृत्रिम विसर्जन तलावात विद्युत प्रवाह आल्याने एका तरुणाचा जीव गेला.आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या जळगावच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला...
उत्सवाच्या आनंदावर विरजण घालणाऱ्या या घटनांमुळे सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. पाहुयात हा रिपोर्ट...।