पुण्यातील चंदननगर परिसरात हुंडाबळीची धक्कादायक घटना घडलीय.चारचाकी गाडी, फ्लॅट आणि सोन्याच्या दागिन्यांसाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या छळाला कंटाळून तेजस्विनी गोरख सोनवणे या विवाहितेने आपलं जीवन संपवलंय.तेजस्विनीचा विवाह २५ जून २०२० रोजी गोरख सोनवणे याच्याशी झाला होता.लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस तिला सासरच्यांकडून चांगली वागणूक मिळाली.मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळींचे वर्तन बदलले. पती गोरख याने कार खरेदी करण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये आणण्याची मागणी सुरू केली.: पैसे आणण्यास नकार दिल्याने तेजस्विनीला बेदम मारहाण आणि सतत मानसिक त्रास दिला जात होता.