Pune| खडकवासला धरणसाखळीत विक्रमी पाणीसाठा, पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात 24.54 TMC ने वाढ

मुसळधार पावसाने खडकवासला धरणसाखळीत विक्रमी पाणीसाठा जमा झालाय. जुलैमध्ये दोन टप्प्यांत झालेल्या मुसळधार पावसाने गेल्या पाच वर्षांतले विक्रम मोडीत काढले. एक जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत धरणसाखळीतल्या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात 24.54 टीएमसीने वाढ झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ही वाढ 10.67 टीएमसी इतकी होती.यंदा जुलैमध्ये खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात 562 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत हा पाऊस केवळ 133 मिलिमीटर होता.

संबंधित व्हिडीओ