हवामान विभागाकडून आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.मात्र दिलासादायक बाब म्हणजे राज्यात सध्या कुठेही ढगफुटीची शक्यता नाही. विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस पाऊस थांबणार आहे.त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात होऊ शकते. सध्या मुंबई ते जळगाव पट्ट्यात मोठे ढग तयार झाल्याचे समोर आले आहे. यावर अधिक माहिती दिली आहे हवामान खात्याचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी.